Gujarat Fire: इमारतीला आग लागल्याने 15 दिवसांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू, गुजरात येथील घटना

गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरुवारी सकाळी दानिलिमड येथे पटेल वास येथील ख्वाजा फ्लॅटला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Gujarat Fire PC Twitter

Gujarat Fire:  गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरुवारी सकाळी दानिलिमड येथे पटेल वास येथील ख्वाजा फ्लॅटला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. पार्किंगच्या जागेत आग लागली होती. ही आग काही क्षणातच दुसऱ्या मजल्यावर पसरली. धक्कादायक म्हणजे या आगीत एका 15 दिवसांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आग प्लॅटच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पसरली आहे. या घटनेत आणखी आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. आगीमुळे परिसरात धुरांचे लोट पसरले आहे, काही लोकांना धुरांमुळे श्वास घेण्यास त्रास होत आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेतून अनेकांची सुटका करण्यात आली आहे. हेही वाचा-  विजापूरच्या मुलींच्या केबिनला भीषण आग, एकाचा मृत्यू, 300 विद्यार्थिनींची केली सुटका

पाहा व्हिडिओ 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement