Massive Fire in girls porta-cabin: छत्तीसगडमधील विजापूर येथील सरकारी निवासी गर्ल्स पोर्टा केबिनमध्ये बुधवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत एका 4 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी आहे, तर ३०० विद्यार्थिनींना वाचवण्यात यश आले आहे. ही घटना अवपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंताकोंटा पोर्टा-केबिनमध्ये घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. ही घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा- अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या राहत्या इमारतीला आग, कोणतीही जीवीतहानी नाही
#WATCH | Chhattisgarh | A massive fire broke out in a government residential girls porta-cabin in Bijapur late last night. All the girls were rescued. The incident occurred in Chintakonta porta-cabin in Awapalli Police Station area of Bijapur. Details awaited. pic.twitter.com/4Xn3PVG28M
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) March 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)