ED Arrested TMC Leader Shankar Adhya: बंगाल रेशन घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते शंकर आध्ये यांना अटक

अंमलबजावणी संचालनालयाने टीएमसी नेते शंकर यांना अटक करून कोलकाता येथील ईडीच्या मुख्यालयात आणले आहे. सध्या आध्ये यांची चौकशी सुरू आहे. टीएमसी नेत्याला अटक करण्यासाठी गेलेल्या ईडी टीमवरही जमावाने हल्ला केला.

ED Arrested TMC Leader Shankar Adhya (PC - X/ANI)

ED Arrested TMC Leader Shankar Adhya: रेशन घोटाळ्याप्रकरणी (Bengal Ration Scam) अंमलबजावणी संचालनालयाचे पथक पश्चिम बंगालमध्ये सातत्याने छापे टाकत आहे. आता मोठी कारवाई करत ईडी (ED) ने रात्री उशिरा तृणमूल काँग्रेसचे नेते शंकर आध्ये (Shankar Adhya) यांना अटक केली. अंमलबजावणी संचालनालयाने टीएमसी नेते शंकर यांना अटक करून कोलकाता येथील ईडीच्या मुख्यालयात आणले आहे. सध्या आध्ये यांची चौकशी सुरू आहे. टीएमसी नेत्याला अटक करण्यासाठी गेलेल्या ईडी टीमवरही जमावाने हल्ला केला. शुक्रवारी ईडीने टीमने शंकर आध्येच्या घरावर छापा टाकला होता. ईडीने टीएमसी नेत्याच्या घरातून 8.5 लाख रुपयांसह अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. (हेही वाचा - Attack on ED Team In WB: नॉर्थ 24 परगणा मध्ये कारवाई साठी निघालेल्या ईडी पथकावर हल्ला; गाडीची तोडफोड (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now