PM Modi Diwali 2021: 'पंतप्रधान मोदी' जवानांसोबत साजरी करणार दिवाळी
यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) यंदाही देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. पीएम मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेजवळ जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत, असे नाही. यापूर्वी 2019 मध्ये आर्टिकल 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमध्ये दिवाळी साजरी केली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement