Rajouri Encounter: राजौरीतील दसल जंगल परिसरात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार; शोध मोहीम सुरू, Watch Video

संरक्षण अधिकार्‍याने सांगितले की, राजौरीजवळील दसल गुजरनच्या जंगल परिसरात संशयास्पद हालचाल लक्षात आल्यानंतर गुरुवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले.

Rajouri Encounter (PC - ANI/Twitter)

Rajouri Encounter: जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. संरक्षण अधिकार्‍याने सांगितले की, राजौरीजवळील दसल गुजरनच्या जंगल परिसरात संशयास्पद हालचाल लक्षात आल्यानंतर गुरुवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. त्यानंतर रात्रभर गोळीबार सुरू होता. जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) मुकेश सिंग यांनी सांगितले की, एक दहशतवादी मारला गेला असून कारवाई सुरू आहे. (हेेही वाचा - Indian Army Shoots Pak Intruder: जम्मू-कश्मीरमधील सांबा जिल्ह्यात बीएसएफ जवानांकडून पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement