Zomato Says 'Sorry': टीम इंडियामुळे झोमॅटोला मागावी लागली आपल्या ग्राहकांची माफी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

टी-20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर आज मुंबईमध्ये भारतीय संघाची जंगी विजय यात्रा काढली जात आहे. यावेळी मरीन ड्राइव्ह परिसरात चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

Zomato Says 'Sorry'

Zomato Says 'Sorry': टी-20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर आज मुंबईमध्ये भारतीय संघाची जंगी विजय यात्रा काढली जात आहे. यावेळी मरीन ड्राइव्ह परिसरात चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. वानखेडे स्टेडियमच्या आजूबाजूला उसळलेला जनसमुदाय पाहता मुंबई पोलिसांनीदेखील या परिसरात जाने टाळण्याचे आवाहन केले आहे. आता या पार्श्वभूमीवर फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने आपल्या ग्राहकांची माफी मागितली आहे. आज मुंबईच्या रस्त्यांवर टीम इंडियाच्या चाहत्यांचा महापूर असल्याने, ऑर्डर्स पोहोचवण्यास उशीर होत आहे व त्यामुळे कंपनीने मुंबईकरांची माफी मागितली आहे.

भारतीय संघाच्या खेळाडूंची ओपन बसमध्ये विजयी परेड काढली जात आहे. अशात सध्या मरीन ड्राइव्ह परिसरात पूर्णपणे खचाखच भरलेला आहे. त्यामुळे रस्ते जाम झाले आहेत. त्यामुळेच झोमॅटोने गमतीशीरपणे म्हटले की, ‘सॉरी मुंबई, आज थोडा उशीर होईल’. (हेही वाचा: Team India Dancing at the Wankhede: वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाने ट्रॉफीसोबत केला डान्स, पाहा व्हिडिओ)

पहा पोस्ट- 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement