Wireless Earphones: वायरलेस इअरफोन्सच्या सतत वापरामुळे 18 वर्षीय तरुणाने गमावली ऐकण्याची क्षमता, करावी लागली शस्त्रक्रिया

अलीकडेच उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका 18 वर्षांच्या मुलाची दीर्घकाळ इयरबड्स वापरल्याने श्रवणशक्ती कमी झाली आहे. त्यानंतर मुलावर शस्त्रक्रिया करावी लागली.

Wireless Earphones

आजच्या काळात तरुणांमध्ये वायरलेस इअरफोन आणि इअरबड्सचा वापर खूप वाढला आहे. मात्र यामुळे तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ इयरफोन वापरल्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. अलीकडेच उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका 18 वर्षांच्या मुलाची दीर्घकाळ इयरबड्स वापरल्याने श्रवणशक्ती कमी झाली आहे. त्यानंतर मुलावर शस्त्रक्रिया करावी लागली. आता मुलाची श्रवणशक्ती सामान्य झाली आहे. इअरबड्सच्या वापरामुळे कानाच्या संसर्ग होऊ शकतो व त्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही इअरबड्स वापरत असाल, तर सावध राहणे गरजेचे आहे.

यासाठी इअरबड्स वापरण्याचा वेळ मर्यादित करा. तुमच्या डिव्हाइसची कमाल आवाज पातळी 60 टक्क्यांपेक्षा जास्त सेट करू नका. नॉइज कॅन्सलेशनसह इअरबड वापरा. आपले कान नियमितपणे स्वच्छ करा. (हेही वाचा: Puri Shocker! दारूच्या व्यसनाला विरोध केल्याने मद्यधुंद मुलाने केली वडिलांची हत्या; आरोपीला अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now