VIDEO: बिहारचे शिक्षणमंत्री Chandra Shekhar Yadav यांचे वादग्रस्त विधान, 'भगवान राम माझ्या स्वप्नात आले व म्हणाले- लोक मला बाजारात विकत आहेत, मला विकण्यापासून वाचवा'

रामचरितमानसवरील वादग्रस्त टिप्पणीनंतर बिहारचे शिक्षणमंत्री आणि आरजेडी नेते चंद्रशेखर यादव यांनी आता पुन्हा एकदा भगवान रामाबाबतत वादग्रस्त विधान केले आहे.

Education Minister Chandra Shekhar Yadav

रामचरितमानसवरील वादग्रस्त टिप्पणीनंतर बिहारचे शिक्षणमंत्री आणि आरजेडी नेते चंद्रशेखर यादव यांनी आता पुन्हा एकदा भगवान रामाबाबतत वादग्रस्त विधान केले आहे. बिहारमध्ये आयोजित एका कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना शिक्षणमंत्री म्हणाले, माझ्या स्वप्नात भगवान राम आले, आणि म्हणाले की लोक मला बाजारात विकत आहेत, मला विकले जाण्यापासून वाचवा. शिक्षणमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर बिहारसह इतर राज्यांमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. मंत्री चंद्रशेखर यादव यांनी अशी वादग्रस्त विधाने करून प्रभू रामाचा अपमान केल्याचे लोकांचे म्हणणे आहे. याआधी 14 सप्टेंबर रोजी पाटणा येथील बिहार हिंदी ग्रंथ अकादमीमध्ये आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना मंत्री चंद्रशेखर यादव यांनी रामचरितमानसमध्ये पोटॅशियम सायनाइड असल्याचे सांगितले होते. (हेही वाचा: Cabinet Meeting: संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान पंतप्रधान मोदींनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक; 'या' मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement