Uttar Pradesh Accident: मुरादाबादमध्ये भीषण अपघात; ट्रकने पिकअप व्हॅनला धडक दिल्याने 8 ठार, 15 जखमी

सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

Accident (PC- File Photo)

उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील भगतपूर पोलीस स्टेशन परिसरात रविवारी दुपारी एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 हून अधिक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. सर्व मृत एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी आणि मृतांपैकी बहुतांश भोजपूर पोलीस ठाण्यांतर्गत कोहरबाकू गावातील रहिवासी आहेत. कोहरबाकू गावातील रहिवासी शब्बीर हे एका लग्नासाठी आपल्या कुटुंबासह वाहनाने जात होते. यावेळी त्यांना दलपतपूर-काशीपूर रस्त्यावर दुपारी दीडच्या सुमारास समोरून येणाऱ्या ट्रकची धडक बसली. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. (हेही वाचा: पुलवामामध्ये मोठा दहशतवादी हल्ला टळला, 5-6 किलो IED सह एका दहशतवाद्याला अटक)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement