UP Shocker: दुकानदाराने रात्री दीड वाजता सिगारेट देण्यास दिला नकार; हल्लेखोरांनी गोळी झाडून केली हत्या, Varanasi मधील धक्कादायक घटना
सिगारेट न दिल्याच्या रागातून दुचाकीस्वरांनी दुकानदारावर गोळ्या झाडल्या आणि नंतर तेथून पळ काढला. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत
वाराणसीच्या चौबेपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बिरनाथीपूर गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी रात्री उशिरा दुचाकीस्वार हल्लेखोरांनी, एका दुकानदाराची गोळ्या झाडून हत्या केली. दुचाकीस्वार दुकानदाराला रात्री उशिरा दुकान उघडून सिगारेट देण्याचा आग्रह करत होते. दुकानदाराने त्याला नकार दिला, त्याने सांगितले की, दुकानाच्या चाव्या घरी आहेत आणि खूप उशीर झाला आहे त्यामुळे तो सिगारेट देऊ शकणार नाही. त्यानंतर सिगारेट न दिल्याच्या रागातून दुचाकीस्वरांनी दुकानदारावर गोळ्या झाडल्या आणि नंतर तेथून पळ काढला. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, रात्री दीडच्या सुमारास अज्ञात दुचाकीस्वार शारदा यादव यांच्या दुकानात आले आणि त्यांनी सिगारेट मागायला सुरुवात केली. शारदा यादव यांनी दुकान बंद असल्याचे सांगून आता सिगारेट सकाळीच मिळणार असल्याचे सांगितले. यावरून दोघांमध्ये वादावादी झाली व त्यांनतर त्यांनी यादव यांची गोळी झाडून हत्या केली. (हेही वाचा: Delhi Shocker: ग्रेटर कैलास येथील जिम मालकाची गोळी झाडून हत्या, आरोपी घटनास्थळावरून फरार, पोलिस तपास सुरु)
सिगारेट देण्यास नकार दिल्याने हल्लेखोरांनी गोळी झाडून केली हत्या-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)