Delhi Shocker: ग्रेटर कैलास येथील जिम मालकाची गोळी झाडून हत्या, आरोपी घटनास्थळावरून फरार, पोलिस तपास सुरु

दिल्लीतील सर्वात पॉश भाग म्हणजे ग्रेटर कैलास परिसर. या परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जिम मालकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली.

Delhi Shocker: ग्रेटर कैलास येथील जिम मालकाची गोळी झाडून हत्या, आरोपी घटनास्थळावरून फरार, पोलिस तपास सुरु
gun shot representative image (PC - Pixabay)

Delhi Shocker: दिल्लीतील सर्वात पॉश भाग म्हणजे ग्रेटर कैलास परिसर. या परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जिम मालकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली. गोळी लागल्यानंतर तो गंभीर जखमी झाला आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (हेही वाचा- जेवणाचे बिल मागितल्यावर गुंडांनी वेटरला कारमधून फरपटत नेले; रात्रभर ओलीस ठेऊन केली मारहाण, गुन्हा दाखल (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर कैलास भागातील ई ब्लॉक येथील गुरुवारी रात्री 10.57 च्या सुमारास एक गोळीबार झाला. या गोळीबारमध्ये एक जिम मालक गंभीर जखमी झाला अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.  पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरु केला. जिम मालकाची हत्या कोणी केली हे अद्याप समोर आले नाही. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल 

गोळीबारच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी ग्रेटर कैलास येथील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी पाच पथक नेमले आहेत. खुनाच्या कलमाअंतर्गत पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या पुढील कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे.

कुटुंबाकडून चौकशी

प्राथमिक तपासात समोर आले की, नादिर शाह यांचा मुलगा जाहीर शाह (35) याचा गोळीबारात मृत्यू झाला. जाहिरची हत्या का केली हे अद्याप समोर आले नाही. पोलिसांनी कुटुंबाची चौकशी सुरु केली आहे. हत्याकांडमध्ये सहभागी असलेले हल्लेखोर मोटारसायकलवरून फरार झाले.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).