Andra Pradesh Video: आंध्र प्रदेशातील मंदिरात चोरी, देवीच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरलं, घटना सीसीटीव्हीत कैद
आंध्र प्रदेशातील एलुरु सत्रमपाडू येथे सौभाग्यलक्ष्मी मंदिरात एक संतापजनक प्रकार घडला आहे.
Andra Pradesh Video: आंध्र प्रदेशातील एलुरु सत्रमपाडू येथे सौभाग्यलक्ष्मी मंदिरात एक संतापजनक प्रकार घडला आहे. भक्ताच्या वेशात आलेल्या चोराने मंदिरात चोरी केली आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एक भक्त मंदिरात प्रवेश करतो त्यानंतर देवीच्या समोर येतो आणि प्रार्थना करतो त्यांनतर तो देवीच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरतो. ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओवर अनेकांनी कंमेट केले आहे. मंगळसुत्र काढून लगेच तो खिशात टाकून मंदिराच्या आवारातून बाहेर पडतो. (हेही वाचा- होळीचा रिल्स शुट करताना तरुणीसोबत घडलं असं काही, पाहा व्हायरल)
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)