Telangana Shocker: 'बाबा मला माफ करा'! परीक्षा केंद्रावर उशिरा आल्याने नाकारला प्रवेश; विद्यार्थ्याने धरणात उडी मारून केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये मागितली वडिलांची माफी
धरणात विद्यार्थ्याची चप्पल, पर्स आणि आत्महत्येचे पत्र सापडल्यानंतर पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. गुरुवारी (29 फेब्रुवारी) दुपारी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
Telangana Student Dies By Jumping Into Dam: परीक्षेला बसू दिले नाही म्हणून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुःखद घटना तेलंगणामधून समोर आली आहे. तेलंगणातील आदिलाबादमध्ये 11 वीचा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचला होता, त्यामुळे त्याला परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर हा विद्यार्थी बेपत्ता झाला होता. टेकुम शिव कुमार असे विद्यार्थ्याचे नाव आहे. काही काळानंतर या विद्यार्थ्याने लिहिलेली सुसाईड नोट समोर आली. परीक्षेला बसू न दिल्याचा धक्का सहन न झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने नमूद केले होते. नोटमध्ये त्याने आपल्या वडिलांची माफी मागितली होती. आता माहिती मिळत आहे की, या विद्यार्थ्याने सतनाळा धरणात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. धरणात विद्यार्थ्याची चप्पल, पर्स आणि आत्महत्येचे पत्र सापडल्यानंतर पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. गुरुवारी (29 फेब्रुवारी) दुपारी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. (हेही वाचा: Bihar News: वृध्द महिलेच्या अंगावरून धावली ट्रेन, पाहा अंगावर काटा आणणारा Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)