Swiggy Snacc: झोमॅटो, झेप्टोशी स्पर्धा करण्यासाठी स्विगीने लाँच केले नवीन ॲप 'स्नॅक'; 10-15 मिनिटांत फूड डिलिव्हरी होणार
या ॲपद्वारे स्विगीने 10-15 मिनिटांत अन्न वितरणाचा दावा केला आहे. स्विगीची ही नवीन सेवा 'स्नॅक' फास्ट फूड, रेडी टू इट फूड विकते. हे स्विगीच्या आधीपासून चालू असलेल्या 'बोल्ट' सेवेपेक्षा वेगळे आहे.
फूड डिलिव्हरी आणि ई-कॉमर्स उद्योग भारतात झपाट्याने विस्तारत आहे. काळानुसार त्यात अनेक बदल होताना दिसत आहेत, जसे की आता क्विक कॉमर्स ट्रेंड त्यात वाढू लागला आहे. या ट्रेंडला अनुसरून स्विगीने आता आपले नवीन ॲप 'Snacc' लाँच केले आहे. या ॲपद्वारे स्विगीने 10-15 मिनिटांत अन्न वितरणाचा दावा केला आहे. स्विगीची ही नवीन सेवा 'स्नॅक' फास्ट फूड, रेडी टू इट फूड विकते. हे स्विगीच्या आधीपासून चालू असलेल्या 'बोल्ट' सेवेपेक्षा वेगळे आहे. स्विगी स्नॅक हे ब्लिंकिटच्या बिस्ट्रो (Blinkit's Bistro) आणि झेप्टो कॅफे (Zepto's Cafe) सारख्या सेवांसारखेच आहे. स्नॅक सध्या बेंगळुरूमध्ये कार्यरत आहे. फास्ट फूड डिलिव्हरीची कल्पना लोकप्रिय ठरत असल्याने, अनेक लहान-मोठ्या कंपन्या या क्षेत्रात उतरत असल्याचे दिसत आहे. झोमॅटोने अलीकडेच 10 मिनिटांत अन्न वितरण सुरू केले आहे, ज्याला टक्कर देण्यासाठी स्विगीने आपले नवीन ॲप 'स्नॅक' लाँच केले असल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा: Amazon Great Republic Day Sale 2025: येत्या 13 जानेवारीपासून सुरू होणार बहुप्रतीक्षित ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल; कपडे, टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टफोनसह अनेक वस्तू स्वस्तात खरेदीची संधी)
स्विगीने लाँच केले नवीन ॲप 'स्नॅक'-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)