MPSC परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार एका वर्षाची मुदतवाढ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी वयोमर्यादा वाढवण्याचे आश्वासन दिले होते
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे. कोरोनामुळे एमपीएससीची परीक्षा झाली नव्हती. यावेळी अनेक विद्यार्थ्यांच वय संपुष्टात आले होते. विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी वयोमर्यादा वाढवण्याचे आश्वासन दिले होते. आता अशा विद्यार्थ्यांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra SSC Result 2025 Re-evaluation, Answer Sheet Photocopy, Supplementary Exam Dates: महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्यास गुणपडताळणी, श्रेणी सुधार परीक्षेसाठी कधी पर्यंत कराल अर्ज?
Maharashtra Board Class 10th Result 2025: महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तुमची गुणपत्रिका DigiLocker वरून अशी करा डाऊनलोड
Maharashtra Board SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल अवघ्या काही तासांवर; 13 मे दिवशी SMS च्या माध्यमातून कसा बघाल?
Maharashtra Board SSC Result 2025 Tentative Date: बारावी नंतर आता दहावी चा निकाल कधी होणार जाहीर?
Advertisement
Advertisement
Advertisement