Student Dies By Jumping Off Water Tank: आर्थिक अडचणींमुळे पाण्याच्या टाकीवरून उडी मारून 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या; Punjab मधील धक्कादायक घटना (Watch Video)

खरारमधील खानापूर गावात गुरुवारी ही घटना घडली असून, सुमित चिक्रा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. आर्थिक अडचणींमुळे तणावातून जात असल्याने विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे वृत्त आहे.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Student Dies By Jumping Off Water Tank: पंजाबमधील घारुआन (Gharuan) गावात चंदीगड विद्यापीठात शिकणाऱ्या हरियाणातील 19 वर्षीय विद्यार्थ्याने पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही भीषण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुण पाण्याच्या टाकीच्या काठावर उभा आहे आणि नंतर जवळपास 5 मजली उंच असलेल्या पाण्याच्या टाकीवरून उडी मारतो.

खरारमधील खानापूर गावात गुरुवारी ही घटना घडली असून, सुमित चिक्रा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. आर्थिक अडचणींमुळे तणावातून जात असल्याने विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे वृत्त आहे. पाण्याच्या टाकीवरून उडी मारण्यापूर्वी विद्यार्थ्याने मनगट कापण्याचाही प्रयत्न केला. टाकीवरून जमिनीवर पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तो त्याच्या पालकांचा एकुलता एक मुलगा होता. (हेही वाचा; Ghatkopar Businessman Dies By Suicide: घाटकोपरच्या 56 वर्षीय व्यावसायिकाची वांद्रे-वरळी सी लिंकवर आत्महत्या; मुलासाठी लिहून ठेवली सुसाईड नोट)

या व्हिडिओमधील दृश्य तुम्हाला विचलित करू शकते- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now