Squeezing Man's Testicles During Fight: भांडणादरम्यान पुरुषाचे वृषण जोरात दाबणे हा 'हत्येचा प्रयत्न' नाही; Karnataka High Court चा निर्णय
उच्च न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले की, आरोपीचा पीडितेला जीवे मारण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि पीडित पुरुषाला ही दुखापत हाणामारीत झाली आहे.
भांडणाच्या वेळी एखाद्या व्यक्तीने समोरच्या पुरुषाचे वृषण जोरात दाबणे याला 'हत्येचा प्रयत्न' म्हणता येणार नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने (एचसी) म्हटले आहे. खालच्या न्यायालयाने 38 वर्षीय आरोपीला एका पुरुषाचे टेस्टिकल्स दाबून त्याला 'गंभीर दुखापत' केल्याबद्दल दोषी ठरवले होते. कनिष्ठ न्यायालयाने दोषीला सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली. आता उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा कनिष्ठ न्यायालयापेक्षा वेगळा आहे. उच्च न्यायालयाने या आरोपीची शिक्षा देखील तीन वर्षांवर आणली.
उच्च न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले की, आरोपीचा पीडितेला जीवे मारण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि पीडित पुरुषाला ही दुखापत हाणामारीत झाली आहे. हायकोर्ट म्हणाले, ‘आरोपी आणि तक्रारदार यांच्यात भांडण झाले व त्या भांडणात आरोपीने फिर्यादीचे वृषण दाबले. त्यामुळे आरोपी खून करण्याच्या उद्देशाने किंवा तयारीने आला होता, असे म्हणता येणार नाही. ही घटना 2010 ची आहे. 2012 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने परमेश्वरप्पा याला या प्रकरणी दोषी ठरवले होते. (हेही वाचा: शिवमोग्गा येथे वैद्यकीय विद्यार्थ्याने भाड्याच्या खोलीत सुरु केली गांजाची शेती; पोलिसांकडून तिघांना अटक, गुन्हा दाखल)