Snake Bite: ज्योतिषाच्या सांगण्यावरून सापासमोर ठेवली जीभ; नागराजने दंश केल्यानंतर गमावली वाणी, Tamil Nadu मधील धक्कादायक घटना

यादरम्यान त्याने एका ज्योतिषाशी संपर्क साधला आणि उपाय विचारला.

Snake | image only representative purpose (Photo credit: Pixabay)

तामिळनाडूमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. या ठिकाणी सापाने एका व्यक्तीच्या जिभेवर चावा घेतला. साप चावल्यानंतर डॉक्टरांनी कसा तरी त्या माणसाचा जीव वाचवला, पण यामध्ये त्याने आपली वाणी गमावली आहे. आता ही व्यक्ती बोलू शकणार नाही. व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी त्याची जीभ कापावी लागली. तामिळनाडूतील इरोडमध्ये एका शेतकऱ्यासोबत ही घटना घडली आहे. कोपिचेट्टीपलायम येथील 54 वर्षीय राजा असे पीडितेचे नाव आहे. या शेतकऱ्याला सर्पदंशाचे स्वप्न पडले होते, त्यामुळे तो घाबरला होता. यादरम्यान त्याने एका ज्योतिषाशी संपर्क साधला आणि उपाय विचारला. ज्योतिषाने राजाला सर्प मंदिरात जाण्याचा आणि वाईट स्वप्नांच्या उपचारासाठी काही विधी करण्याचा सल्ला दिला. सांगितल्याप्रमाणे, शेतकऱ्याने मंदिरात जाऊन धार्मिक विधी केले आणि शेवटी, राजाने सापासमोर तीनदा जीभ बाहेर काढली. दरम्यान, विषारी सापाने त्याच्या जिभेचा चावा घेतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)