Snake On Car: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर चालत्या कारच्या काचावर अचानक आला साप

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ताशी ९० किमी वेगाने धावणाऱ्या कारच्या पुढील काचावर अचानक साप आल्याने खळबळ उडाली. चालकाने प्रसंगावधान राखून कार बाजूला घेतली आणि सर्पमित्रांच्या मदतीने सापाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाला अत्यंत धडकी भरवणारा अनुभव आला. ताशी तब्बल ९० किलोमीटरच्या वेगाने धावणाऱ्या ह्युंदाई आय-२० (Hyundai i20) कारच्या पुढील काचावर (Windshield) अचानक एक साप येऊन बसला. या अनपेक्षित प्रसंगाने कारमधील प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली होती. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement