Smallest Washing Machine: भारतीय तरुणाने बनवली जगातील सर्वात लहान वॉशिंग मशीन; आकार केवळ 1.5 इंच, Guinness World Records मध्ये नोंद
साजी म्हणाला की, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा भाग होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने हे मशीन बनवले आहे. हे मशीन कोणत्याही सामान्य मोठ्या मशीनप्रमाणे काम करते आणि त्यात कपडे देखील धुता येतात.
Smallest Washing Machine: भारताच्या सेबिन साजी याने जगातील सर्वात लहान वॉशिंग मशीन बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे. हे यंत्र इतके लहान आहे की, ते आपल्या मुठीतही बसू शकते. केरळमधील कांजिरापल्ली येथील रहिवासी असलेल्या साजीने बनवलेले हे यंत्र केवळ 1.28 इंच लांब, 1.32 इंच रुंद आणि 1.52 इंच उंच आहे. त्याचे वजन फक्त 25 ग्रॅम आहे, जे एखाद्या कुकीपेक्षा किंचित जास्त आहे. साजी म्हणाला की, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा भाग होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने हे मशीन बनवले आहे. हे मशीन कोणत्याही सामान्य मोठ्या मशीनप्रमाणे काम करते आणि त्यात कपडे देखील धुता येतात.
जरी हे छोटे वॉशिंग मशिन सामान्य वापरासाठी व्यावहारिक नसले तरी, याने सूक्ष्म अभियांत्रिकीच्या अनंत शक्यता उघड केल्या आहेत. याआधी जगातील सर्वात लहान व्हॅक्यूम क्लिनर देखील भारतात बनवण्यात आले होते, ज्याचा आकार फक्त 0.65 इंच होता. याआधी आंध्र प्रदेशच्या साई तिरुमलानिधी यांनी जगातील सर्वात लहान वॉशिंग मशीन बनवले होते. 17 जून 2023 रोजी त्याने हा विक्रम केला होता. या मशीनचा आकार 37 मिमीx 41 मिमीx 43 मिमी होता. (हेही वाचा: World’s largest iPhone: जगातील सर्वात मोठा आयफोन, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; भारतीय वंशाच्या ब्रिटीश यूट्यूबरची कमाल)
Smallest Washing Machine-
New record: Smallest washing machine - 32.5 x 33.6 x 38.7 mm (1.28 in x 1.32 in x 1.52 in) made by Sebin Saji 🇮🇳 pic.twitter.com/NLOPxfH2zX
— Guinness World Records (@GWR) October 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 16, 2024 06:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

