Rs 2000 Note Exchange: दिल्लीमध्ये पेट्रोल पंप वर 2000 ची नोट घेण्यास नकार दिलेल्या कर्मचार्याला पोलिसांनी केली अटक
दिल्लीमध्ये पेट्रोल पंप वर 2000 ची नोट घेण्यास नकार दिलेल्या कर्मचार्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना South Extension Part-1 मधील आहे. एका ग्राहकाने 400 रूपयांच्या व्यवहारासाठी 2 हजारची नोट दिली होती. पण या व्यवहारासाठी पेट्रोल पंप वरील कर्मचार्याने नकार दिला. त्यानंतर ग्राहकाने पोलिसांत तक्रार नोंदवताच त्यांनी कारवाई करत संबंधित कर्मचार्याला अटक केली आहे. आरबीआय ने 30 सप्टेंबर पर्यंत 2000 च्या नोटा बॅंकेत जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. पण या नोटा वैध चलन असल्याने व्यवहारात सध्या वापरण्यासही मुभा आहे. पण काही दुकानदार 2 हजारची नोट टाळत आहेत यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. (हेही वाचा, आजपासून बॅंकेमध्ये 2000 च्या नोटा बदलून मिळणार; बॅंकेमध्ये जाण्यापूर्वी जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी!)
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)