Rameshwaram Cafe Blast Case: रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी NIA ने दोन संशयितांवर जाहीर केले प्रत्येकी 10 लाखांचे बक्षीस

एनआयएने बेंगळुरू रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक केली. मुजम्मिल शरीफ नावाचा हा सूत्रधार तीन राज्यात 18 ठिकाणी शोध घेतल्यानंतर पकडला गेला. मुजम्मिलने स्फोटासाठी उपकरण, पैसे आणि इतर सुविधा पुरवल्या होत्या आणि रेस्टॉरंटमध्ये बॅग ठेवल्यानंतर मुसावीरला पळून जाण्यात मदत केली होती.

Rameshwaram Cafe Blast Case

Rameshwaram Cafe Blast Case: बेंगळुरूमधील रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोटातील दोन संशयितांवर केंद्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयए (NIA) ने 20 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन संशयितांची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. एनआयएने कॅफेमध्ये आयईडी लावणारा मुसावीर हुसेन शाजिब आणि कटात सहभागी असलेला अब्दुल मतीन ताहा या दोन आरोपींची छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. हे दोघेही 2020 च्या दहशतवाद प्रकरणात आधीच वॉन्टेड आहेत. यासह गुरुवारी एनआयएने बेंगळुरू रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक केली. मुजम्मिल शरीफ नावाचा हा सूत्रधार तीन राज्यात 18 ठिकाणी शोध घेतल्यानंतर पकडला गेला. मुजम्मिलने स्फोटासाठी उपकरण, पैसे आणि इतर सुविधा पुरवल्या होत्या आणि रेस्टॉरंटमध्ये बॅग ठेवल्यानंतर मुसावीरला पळून जाण्यात मदत केली होती. रेस्टॉरंटमध्ये स्फोटक असलेली बॅग ठेवणारा मुसावीर शाजेब हा अद्याप फरार असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील आणखी एक व्यक्ती अब्दुल मतीन ताहा हा देखील एनआयएला हवा आहे. (हेही वाचा: BSP MLA Raju Pal Murder Case: राजू पाल हत्येप्रकरणी अतिक अहमद टोळीतील सहा जणांना जन्मठेप, तर एकाला 4 वर्षे कारावासाची शिक्षा)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement