Ram Navami 2021: राम नवमी निमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी राम नवमीच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी राम नवमीच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी संदेशात म्हटले आहे:- 'राम नवमीच्या शुभ प्रसंगी मी देशातील सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.'
'भगवान श्री राम यांचा जन्मदिन राम नवमी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. न्याय आणि मानवी प्रतिष्ठेसाठी प्रयत्न करत असताना आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या आदर्शांमधून मोठे बळ मिळते. भगवान श्री राम यांनी आपल्याला धर्मानुसार जीवन कसे जगावे हे शिकवले. त्यांचे संपूर्ण जीवन आणि सदाचार, सत्यनिष्ठा आणि संयम या त्यांच्या शिकवणुकीतून आपल्याला प्रेरणा मिळते. या निमित्ताने आपण भगवान राम यांची आदर्श मूल्ये आपल्या जीवनात अंगीकारण्यासाठी आणि एक वैभवशाली भारत घडविण्याच्या दिशेने एकत्रितपणे प्रयत्न करू या.'
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2025 HD Images: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे करा शंभूराजांना त्रिवार वंदन!
Advertisement
Advertisement