Odisha Train Accident: नरेंद्र मदीजी आपण रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? काँग्रेसचा सवाल
मदत आणि बचाव कार्य आता संपले असून रेल्वेचे झालेले नुकसान आणि अपघात घडलेल्या रेल्वे मार्गांच्या दुरुस्तीचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे.
ओडिशा राज्यातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले. मदत आणि बचाव कार्य आता संपले असून रेल्वेचे झालेले नुकसान आणि अपघात घडलेल्या रेल्वे मार्गांच्या दुरुस्तीचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, विरोधी पक्ष जोरदार आक्रमक झाले असून, त्यांनी रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाने रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून याबाबत ट्विटर पोस्ट केली आहे. (हेही वाचा, Odisha Train Accident: LIC ने बालासोर दुर्घटनेतील पीडितांसाठी जाहीर केल्या अनेक सवलती; क्लेम सेटलमेंटला आणणार गती)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)