Odisha Train Accident: LIC ने बालासोर दुर्घटनेतील पीडितांसाठी जाहीर केल्या अनेक सवलती; क्लेम सेटलमेंटला आणणार गती

एलआयसी पॉलिसी आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या दावेदारांच्या अडचणी कमी करण्यासाठी कॉर्पोरेशनने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.

Odisha Train Accident: LIC ने बालासोर दुर्घटनेतील पीडितांसाठी जाहीर केल्या अनेक सवलती; क्लेम सेटलमेंटला आणणार गती
LIC | (File Image)

भारतीय आयुर्विमा म्हणजेच एलआयसीने (LIC) शनिवारी रात्री सांगितले की, ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या दुःखद रेल्वे दुर्घटनेत बाधित झालेल्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी क्लेम सेटलमेंटला गती आणली जाईल. दावेदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पीडित कुटुंबांचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे एलआयसीच्या निवेदनात म्हटले आहे. पुढील सहाय्यासाठी, दावेदार त्यांच्या जवळच्या शाखा, मंडळ किंवा ग्राहक क्षेत्राशी संपर्क साधू शकतात, असे एलआयसीने सांगितले. त्यात पुढे म्हटले आहे की, ‘दावेकर्ते आमच्या कॉल सेंटर-02268276827 वर देखील कॉल करू शकतात.’

एलआयसी पॉलिसी आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या दावेदारांच्या अडचणी कमी करण्यासाठी कॉर्पोरेशनने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, नोंदणीकृत मृत्यू प्रमाणपत्रांच्या बदल्यात, रेल्वे, पोलीस किंवा कोणत्याही राज्य किंवा केंद्र प्राधिकरणाने प्रकाशित केलेल्या मृतांची यादी मृत्यूचा पुरावा म्हणून स्वीकारली जाईल. (हेही वाचा: पीएम नरेंद्र मोदी यांनी ओडिशा रेल्वे दुर्घटनेत बचाव कार्यात सहभागी लोकांच्या कामाचे केले कौतुक; जागतिक नेत्यांच्या शोकसंदेशांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2023 11:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).