Odisha Coromandel Express Accident: बालासोरच्या बहनगा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेसला मोठा अपघात; अनेक डबे रुळावरून घसरले

ओडिशातील बालासोरपासून सुमारे 40 किमी अंतरावर या ट्रेनला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही ट्रेन चेन्नई सेंट्रल ते कोलकात्याच्या शालीमार रेल्वे स्थानकापर्यंत धावते.

Odisha Coromandel Express Accident

हावडाहून चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडल एक्स्प्रेसला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. ओडिशातील बालासोरपासून सुमारे 40 किमी अंतरावर या ट्रेनला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही ट्रेन चेन्नई सेंट्रल ते कोलकात्याच्या शालीमार रेल्वे स्थानकापर्यंत धावते. ही ट्रेन शुक्रवारी संध्याकाळी ओडिशातील बालासोरच्या बहनगा स्टेशनजवळ रुळावरून घसरल्याची माहिती मिळत आहे. शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. जिल्हाधिकारी, बालासोर यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील बालासोरपासून 40 किमी अंतरावर मालगाडीला ही ट्रेन धडकली. मालगाडीला धडक दिल्यानंतर 3 स्लीपर कोच सोडून, बाकीचे डबे रुळावरून घसरले. प्राथमिक माहितीत या डब्यांची संख्या 18 असल्याचे सांगण्यात येत आहे.

या दुर्घटनेत किती नुकसान झाले याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून अनेकांचा बळी गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना कशी घडली याबाबतही कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही, मात्र दोन्ही गाड्या एकाच मार्गावर आल्याने हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सिग्नल बिघडल्याने दोन्ही गाड्या एकाच रुळावर येऊन धडकल्याची माहिती आहे. (हेही वाचा: मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत 98 ठार, तर 310 जखमी; जाळपोळीच्या 4,000 हून अधिक घटनांची नोंद)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement