Nagaland Politics: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भाजपला पाठिंबा, नागालँडमध्ये विरोधी पक्षनेताच नसणार
त्यापैकी 7 जागांवर राष्ट्रवादीला विजय प्राप्त करता आला.
राज्यातले कट्टर विरोधी पक्ष असलेले भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) नागालँडमध्ये (Nagaland) मात्र एकत्र सरकारमध्ये बसणार आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाप्रणित आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 12 जागांसाठी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 7 जागांवर राष्ट्रवादीला विजय प्राप्त करता आला. नागालँड विधिमंडळात राष्ट्रवादीने पक्षनेते, उपनेते, प्रमुख प्रतोद आणि प्रवक्ते यांची निवड केली आहे. तसेच नवनियुक्त आमदारांनी आणि स्थानिक पक्षनेत्यांनी राज्याच्या व्यापक हितासाठी मुख्यमंत्री एन.रिओ यांच्या नेतृत्वातील एनडीपीपी (NDPP) सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रवादीने सांगितले.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)