Narendra Modi Oath-Taking Ceremony Live Streaming: नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ; पहा राष्ट्रपती भवनातून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण (Video)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ देणार आहेत. राष्ट्रपती भवनात हा सोहळा आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे.
Narendra Modi Oath-Taking Ceremony Live Streaming: लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये विजय मिळवल्यानंतर, एनडीए सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. य्याआधी 7 जूनला एनडीए पक्षांनी आणि नवनिर्वाचित खासदारांनी नरेंद्र मोदी यांची एनडीएचा नेता म्हणून निवड केली. आता नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या टर्मसाठी रविवार, 9 जून रोजी सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आज त्यांच्या मंत्रिमंडळात सामील होणारे मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा अनेक अर्थांनी खास असेल. या सोहळ्यात एकीकडे जगभरातील प्रमुख नेते सहभागी होणार आहेत, तर दुसरीकडे स्वच्छता कर्मचारी, ट्रान्सजेंडर आणि मजूरही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला एकूण 8,000 पाहुणे उपस्थित राहू शकतात. त्यादृष्टीने दिल्लीत जोरदार तयारी केली गेली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ देणार आहेत. राष्ट्रपती भवनात हा सोहळा आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. याशिवाय, तुम्ही राष्ट्रपती भवन, पीआयबी, नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरही ते पाहू शकता. (हेही वाचा: Narendra Modi Cabinet Ministers List: नितीन गडकरी, पियुष गोयल यांच्यासह महाराष्ट्रातील सहा खासदारांचा मंत्रीमंडळात समावेश; Devendra Fadnavis यांनी सांगितली यादी)
या ठिकाणी पहा नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचे थेट प्रक्षेपण-
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 09, 2024 06:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

