Mumbai Local Monthly Pass: ​रेल्वे प्रशासन जारी करत आहे मासिक पास; 15 ऑगस्ट 2021 पासून होणार लागू- Central Railway

15 ऑगस्ट 2021 पूर्वी जारी होत असला तरी, त्याची विधी ग्राह्यता दि. 15 ऑगस्ट 2021 पासूनच लागू होईल

लोकल ट्रेन | प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्या लोकांना, मुंबई महानगर क्षेत्रातील उपनगरीय गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी सरकारने दिलेल्या परवानगीनुसार, रेल्वे प्रशासन मासिक पास जारी करीत आहे. सदर मासिक पास दि. 15 ऑगस्ट 2021 पूर्वी जारी होत असला तरी, त्याची विधी ग्राह्यता दि. 15 ऑगस्ट 2021 पासूनच लागू होईल. त्यामुळे प्रवाशांच्या मासिक पासमधील दिवस वाया जाणार नाहीत. प्रवाशांच्या सुविधेकरीता बुकिंग काऊंटरची संख्या

वाढवण्यात आलेली आहे. विनंती आहे की, प्रवाशांनी योग्य प्रकारे मास्क घालावा. मध्ये रेल्वेने ही माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)