MP Shocker: भोपाळमध्ये रस्त्यावर पोलीस कर्मचाऱ्याकडून तरुणीचा विनयभंग; मुलीला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न, घटना कॅमेऱ्यात कैद (Watch)

हा व्हिडीओ भोपाळचा असल्याचे सांगितले जात आहे, मात्र अद्याप याची पुष्टी झालेली नाही.

पोलीस कर्मचाऱ्याकडून तरुणीचा विनयभंग

मध्य प्रदेशात मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पोलीस कर्मचारी रोडवर एका मुलीची छेड काढताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये गणवेशधारी पोलीस तरुणीचा विनयभंग करत असलेला दिसत आहे. हा व्हिडीओ भोपाळचा असल्याचे सांगितले जात आहे, मात्र अद्याप याची पुष्टी झालेली नाही. हा पोलीस रात्रीच्या वेळी रस्त्यावर लोडिंग वाहनाच्या मागे या मुलीला पकडण्याचा व तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता, ज्याचा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement