Madhavi Raje Scindia Passes Away: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मातोश्री माधवी राजे सिंधिया यांचे निधन; दिल्ली एम्समध्ये चालू होते उपचार
त्या नेपाळच्या राजघराण्यातील आहे. 8 मे 1966 रोजी ग्वाल्हेरचे तत्कालीन महाराज माधवराव सिंधिया यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
Madhavi Raje Scindia Passes Away: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई माधवी राजे सिंधिया यांचे निधन झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्या दिल्ली एम्समध्ये दाखल होत्या. दिल्ली एम्समध्ये सकाळी 9.28 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्या काही काळ व्हेंटिलेटरवर होत्या. निवडणुकीदरम्यानही त्यांची तब्येत अनेकदा बिघडली, त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया आणि इतर कुटुंबीयांना निवडणूक प्रचार सोडून दिल्लीला जावे लागले होते. त्यांच्या निधनामुळे दिल्लीपासून मध्य प्रदेशापर्यंत शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने ग्वाल्हेर राजघराण्याचे मोठे नुकसान झाले आहे.
सिंधिया राजघराण्याची सून होण्यापूर्वी माधवी राजे यांचे नाव किरण राज लक्ष्मी होते. त्या नेपाळच्या राजघराण्यातील आहे. 8 मे 1966 रोजी ग्वाल्हेरचे तत्कालीन महाराज माधवराव सिंधिया यांच्याशी त्यांचा विवाह झाला. राजघराण्यातील असूनही माधवी राजे यांनी नेहमी पडद्यामागे काम केले. राजकारणात त्या कधीच सक्रिय झाल्या नाहीत. (इही वाचा: Fire Erupts at Income Tax office in Delhi: दिल्लीतील आयकर कार्यालयाला लागलेल्या आगीत एका अधिकाऱ्याचा मृत्यू; 7 जणांची सुटका)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)