Lok Sabha Speaker Election 2024: लोकसभा अध्यक्ष पदी पुन्हा Om Birla!

एनडीए कडून ओम बिर्ला आणि इंडिया ब्लॉक कडून के सुरेश रिंगणात होते.

Om Birla | Twitter

लोकसभेमध्ये पहिल्यांदाच अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निवडणूक झाली असून त्यासाठी एनडीए कडून ओम बिर्ला आणि इंडिया ब्लॉक कडून के सुरेश रिंगणात होते. उपस्थित खासदारांनी केलेल्या मतदानानुसार, ओम बिर्ला यांच्या पारड्यात किती मतं पडली आहेत याचे विभाजन देण्यास हंगामी अध्यक्षांनी नकार दिला आहे.  भाजपा आणि कॉंग्रेस कडून खासदारांना या मतदानासाठी व्हिप जारी करण्यात आला होता. अध्यक्षांची निवड साध्या बहुमताने झाली आहे. ओम बिरला यांच्या अध्यक्षपदाच्या प्रस्तावाला 13 पक्षांचा पाठिंबा होता. ओम बिर्ला दुसर्‍यांदा लोकसभा अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. मागील लोकसभेतही त्यांनी ही जबाबदारी सांभाळली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement