LIC To Get Two New MDs: एलआयसीचे दोन नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून FSIB ने केली M Jagannath आणि Tablesh Pandey यांची शिफारस

सध्या, एलआईसीचे चार एमडी आहेत, त्यापैकी दोन लवकरच त्यांच्या पदावरून निवृत्त होत आहेत.

LIC | (File Image)

वित्तीय सेवा संस्था ब्युरो (Financial Services Institutions Bureau-FSIB) ने एम जगन्नाथ, तबलेश पांडे यांची भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून शिफारस केली आहे. एफएसआयबीने आपल्या शिफारशीत म्हटले आहे की, त्यांनी व्यवस्थापकीय संचालकांच्या पदांसाठी सहा उमेदवारांशी संवाद साधला. उमेदवारांची कामगिरी आणि त्यांच्या एकूण अनुभवाच्या आधारावर एफएसआयबीने एम जगन्नाथ यांना पहिल्या जागेसाठी आणि तबलेश पांडे यांना एलआयसीमधील दुसऱ्या एमडी रिक्त पदासाठी शिफारस केली आहे.

सध्या, एलआईसीचे चार एमडी आहेत, त्यापैकी दोन लवकरच त्यांच्या पदावरून निवृत्त होत आहेत. राज कुमार, सर्वात ज्येष्ठ एमडी यांना एक वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे, जे 31 जानेवारी रोजी निवृत्त होतील. दुसरे एमडी बी सी पटनायक यांचा कार्यकाळ या वर्षी 31 मार्च रोजी संपणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now