Kolkata Doctor Rape-Murder Case: आयएमएकडून 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजल्यापासून देशव्यापी 24 तासांच्या संपाची घोषणा; अत्यावश्यक सेवा चालू राहतील
आरजी कार हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री झालेल्या तोडफोडीनंतर डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाची घोषणा केली आहे.
Kolkata Doctor Rape-Murder Case: इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ, देशभरात 17 ऑगस्ट रोजी 24 तासांच्या संपाची हाक दिली आहे. हा संप 17 ऑगस्टला सकाळी 6 वाजता सुरू होईल आणि 24 तासांनंतर 18 ऑगस्टला संपेल. या बलात्कार आणि हत्या घटनेमुळे देशभरातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आता गुरुवारी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने या संपाबाबत घोषणा केली. यावेळी ओपीडीसह अनेक आरोग्य सेवा ठप्प होणार आहेत. आयएमएच्या निवेदनामध्ये सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांचे डॉक्टर संपावर जाणार असल्याचे सांगण्यात आले.
आयएमएने म्हटले आहे, ‘संपावेळी सर्व अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या जातील. नियमित ओपीडी कार्य करणार नाहीत आणि वैकल्पिक शस्त्रक्रिया केल्या जाणार नाहीत. ज्या ठिकाणी आधुनिक वैद्यक डॉक्टर सेवा देत आहेत त्या सर्व क्षेत्रांमध्ये सेवा बंद राहतील. आयएमएला आपल्या डॉक्टरच्या न्याय्य कारणासाठी देशाची सहानुभूती आवश्यक आहे.’ (हेही वाचा: घरातला मुलगा संध्याकाळी 7 नंतर...'; कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणावर अभिनेता Siddharth Chandekar ने व्यक्त केला संताप)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)