Kidney Scam in Andhra Pradesh: कर्ज फेडण्यासाठी विकली किडनी; 30 लाखाऐवजी मिळाले अवघे 50 हजार, गुंटूर येथील ऑटो-रिक्षा चालकाची फसवणूक (Video)
त्याचा व्यवसाय फसल्याने तो या कर्जाची परतफेड करू शकला नाही. हेच कर्ज फेडण्यासाठी त्याने आपली किडनी विकण्याचा निर्णय घेतला.
Kidney Scam in Andhra Pradesh: विशाखापट्टणममध्ये अवैध मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर काही दिवसांनी, आता गुंटूरमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. कर्ज देणाऱ्या ॲप्सच्या जाळ्यात अडकलेल्या 31 वर्षीय ऑटो-रिक्षा चालकाची दोनपैकी एक किडनी विकून फसवणूक करण्यात आली. या कथित किडनी विक्री रॅकेट पीडित जी मधु बाबू याने गुंटूर एसपींना दिलेल्या माहितीनुसार, त्याने फेसबुकवरील जाहिरात पाहून एका एजंटमार्फत आपली किडनी दान केली होती. तथाकथित एजंटने जी मधु बाबू याला त्याच्या किडनीसाठी 30 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर काही बनावट कागदपत्रे तयार केली गेली व पुढे विजयवाडा येथील विजया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्याची शस्त्रक्रिया झाली. मात्र, ऑपरेशनच्या सात महिन्यांनंतर, मधुला फक्त 50,000 रुपये देण्यात आले.
अहवालानुसार, मधुने विविध मोबाइल ॲप्लिकेशन्स आणि स्थानिक फायनान्सर्सकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले होते. त्याचा व्यवसाय फसल्याने तो या कर्जाची परतफेड करू शकला नाही. हेच कर्ज फेडण्यासाठी त्याने आपली किडनी विकण्याचा निर्णय घेतला. मात्र यामध्ये त्याची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यात आली. (हेही वाचा: Supreme Court On AIBE Cut-Off: 'वकील व्हायचे असेल तर अभ्यास करा...'; सुनावणीदरम्यान CJI चंद्रचूड संतापले)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)