Karnataka: दहावीच्या विद्यार्थिनीला पाठवले अश्लील मेसेज, केले गैरवर्तन; शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक
मुख्याध्यापकाने मुलीला आपल्या प्रेयसीसारखे वागण्यास सांगितले होते, असे तरुणीने पोलिसांना सांगितले होते. त्याने तिला अनेक मेसेज पाठवून तिच्या घरी त्याच्यासोबत वेळ घालवायला भाग पाडले.
कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यात दहावीच्या विद्यार्थिनीशी अश्लील मेसेज पाठवल्याबद्दल आणि तिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. ही घटना शक्तीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. लवकरच निवृत्त होणार्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीच्या मोबाईलवर मेसेज करायला सुरुवात केली होती. मुख्याध्यापकाने मुलीला आपल्या प्रेयसीसारखे वागण्यास सांगितले होते, असे तरुणीने पोलिसांना सांगितले होते. त्याने तिला अनेक मेसेज पाठवून तिच्या घरी त्याच्यासोबत वेळ घालवायला भाग पाडले. तिने सहकार्य न केल्यास दहावीच्या बोर्डात तिला त्रास देऊ, अशी धमकीही त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडून छळ होत असल्याची बाब मुलीने पालकांना सांगितल्यावर त्यांनी मुख्याध्यापकाला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्यावर पोक्सो, लैंगिक छळ आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.