Jammu-Kashmir: मुलीला मृत घोषित केल्यानंतर केले दफन; काही काळानंतर कबर खोदल्यावर आढळली जिवंत
स्थानिकांनी त्यांच्या स्मशानभूमीत तिला पुरल्याबद्दल आक्षेप घेतला व कुटुंबाला तिची कबर खोदण्यास भाग पाडले.
जम्मू-काश्मीरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आज सकाळी बनिहाल येथील रुग्णालयात जन्मानंतर लगेचच एका मुलीला मृत घोषित करण्यात आले होते. त्यानंतर या मुलीचे दफन करण्यात आले, मात्र तिला पुरल्यानंतर स्थानिकांनी त्यांच्या स्मशानभूमीत तिला पुरल्याबद्दल आक्षेप घेतला व कुटुंबाला तिची कबर खोदण्यास भाग पाडले. आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा या मुलीची कबर खोदण्यात आली तेव्हा ती मुलगी जिवंत असल्याचे आढळले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)