India's Retail Inflation in February: फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई 5.09 टक्क्यांवर; गेल्या चार महिन्यांतील नीचांकी पातळी

मंगळवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, किरकोळ महागाई फेब्रुवारीमध्ये मागील महिन्याच्या तुलनेत किरकोळ घसरून 5.09 टक्क्यांवर आली आहे.

Inflation | (Photo Credits: ANI)

India's Retail Inflation in February: महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना किरकोळ दिलासा मिळाला आहे. जानेवारीनंतर फेब्रुवारी महिन्यातही महागाईत काहीशी घट झाली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, किरकोळ महागाई फेब्रुवारीमध्ये मागील महिन्याच्या तुलनेत किरकोळ घसरून 5.09 टक्क्यांवर आली आहे. फेब्रुवारीमधील हा 5.09 टक्के महागाई दर गेल्या चार महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित चलनवाढ जानेवारी 2023 मध्ये 5.1 टक्के आणि फेब्रुवारी 2023 मध्ये 6.44 टक्के होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) च्या आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांची महागाई फेब्रुवारीमध्ये 8.66 टक्के होती, जी मागील महिन्यातील 8.3 टक्क्यांपेक्षा किरकोळ जास्त आहे. (हेही वाचा: indian railways: फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वे मालामाल, दंडवसुलीत मागील वर्षापेक्षा ३५ टक्क्यांची वाढ)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement