India Developed Herd Immunity: भारतात अपयशी ठरेल कोरोनाची लाट; इथल्या लोकांमध्ये तयार झाली आहे हर्ड इम्युनिटी, जाणून घ्या एम्सच्या डॉक्टरांचे मत

देशातील बहुतेक लोक कोरोनाची लागण झाल्यानंतर बरे झाले आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये हर्ड इम्युनिटी तयार झाली आहे, जी नवीन व्हेरिएंटशी लढण्यासाठी प्रभावी आहे.

Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

India Developed Herd Immunity: सध्या जगभरात कोरोना विषाणू रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहेत. चीन, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये पूर्वीच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. सूत्रांनुसार, पुढील 40 दिवस भारतासाठी खूप गंभीर असू शकतात.

आता एम्सचे यूरोलॉजिस्ट अनुप कुमार यांनी सांगितले की, डब्ल्यूएचओने याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली असून, भारत सरकारने देखील मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. सरकार आपल्या स्तरावर काम करत असून याबाबत मॉक ड्रीलही झाली आहे, मात्र आता जनतेने सरकारला सहकार्य करावे. त्यातल्या त्यात एक दिलासादायक बाब म्हणजे, भारतात हर्ड इम्युनिटी निर्माण झाली आहे.

देशातील बहुतेक लोक कोरोनाची लागण झाल्यानंतर बरे झाले आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये हर्ड इम्युनिटी तयार झाली आहे, जी नवीन व्हेरिएंटशी लढण्यासाठी प्रभावी आहे.