IB Chief Tapan Deka Gets an Extension: इंटेलिजन्स ब्युरो प्रमुख तपन कुमार डेका यांना सेवेत एक वर्षाची मुदतवाढ
अशा स्थितीत केंद्र सरकारने त्यांना पुन्हा एकदा सेवेत एक वर्षाची मुदतवाढ देऊन मोठी जबाबदारी दिली आहे.
IB Chief Tapan Deka Gets an Extension: इंटेलिजेंस ब्युरो (IB) प्रमुख तपन कुमार डेका यांना सोमवारी कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार, जून 2025 पर्यंत एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. तपन डेका हे हिमाचल प्रदेश केडरचे 1988 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आहेत. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गुप्तचर विभागाचे संचालक म्हणून डेका यांची सेवा 30 जून 2024 नंतर, एक वर्षाच्या कालावधीसाठी वाढविण्यास मंजुरी दिली आहे. डेका हे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अशा स्थितीत केंद्र सरकारने त्यांना पुन्हा एकदा सेवेत एक वर्षाची मुदतवाढ देऊन मोठी जबाबदारी दिली आहे. डेका यांनी आपल्या कारकिर्दीचा बहुतांश काळ इंटेलिजन्स ब्युरोमध्ये घालवला आहे. ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अतिरिक्त संचालकही राहिले आहेत. (हेही वाचा: Kerala Rename: केरळ राज्याचे नाव बदलून 'केरळम' करण्याचा निर्णय; विधानसभेत ठराव मंजूर)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)