Haryana Shocker: फरिदाबादमध्ये दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला 4 वर्षांचा मुलगा, उपचारादरम्यान मृत्यू; समोर आला धक्कादायक व्हिडिओ (Watch)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मुलगा अचानक त्याच्या घरासमोरील रस्त्यावर पडताना आणि जखमी होताना दिसत आहे.

Haryana Shocker

फरिदाबादच्या डबुआ कॉलनीत काल संध्याकाळी उशिरा एका 4 वर्षांच्या मुलाचा घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. हा मुलगा रस्त्यावरून जात असलेल्या आपल्या मोठ्या बहिणीला निरोप देत असताना अचानक त्याचा तोल गेला व तो खाली पडला. त्यानंतर त्याला ताबडतोब फरिदाबाद येथील ईएसआय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मुलगा अचानक त्याच्या घरासमोरील रस्त्यावर पडताना आणि जखमी होताना दिसत आहे. (हेही वाचा: शाळकरी मुलींच्या व्हॅनचा पाठलाग करताना दुचाकीस्वाराने केले हस्तमैथुन; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दिले तपासाचे आदेश, पहा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)