Karachi University Viral Video: शाळकरी मुलींच्या व्हॅनचा पाठलाग करताना दुचाकीस्वाराने केले हस्तमैथुन; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दिले तपासाचे आदेश, पहा
Biker Masturbates Viral Video (PC - Twitter)

Karachi University Viral Video: पाकिस्तान (Pakistan) च्या कराची (Karachi) येथून सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक दुचाकीस्वार मोटरसायकल चालवताना हस्तमैथुन करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांनी भरलेल्या व्हॅनचा पाठलाग करताना दुचाकीस्वार हस्तमैथुन (Masturbating) करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हॅनमध्ये बसलेल्या एका विद्यार्थिनीने हा व्हिडिओ शूट केला.

कराची विद्यापीठातील विद्यार्थिनींनी भरलेल्या व्हॅनचा पाठलाग करत असताना ही घटना घडली. मोटारसायकलवरून व्हॅनचा पाठलाग करत असताना या व्यक्तीने रशीद मिन्हास रोडवर मुलींसमोर चालत्या दुचाकीवर हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. व्हॅनमधील एका मुलीने या माणसाचे कृत्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले. (हेही वाचा - Ghaziabad: 'जय माता दी' स्टिकर असलेल्या वाहनाला दंड ठोठावल्याने हिंदू गटाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण, Watch Video)

दुचाकीवर हस्तमैथुन करणाऱ्या तरुणाने हेल्मेट घातलेले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे.