Gujarat Tragedy: गणपती विसर्जन करताना राजकोट धरणात काका पूतण्याचा बुडून मृत्यू (Watch Video)
दरम्यान, महाराष्ट्रातून गणपती विसर्जनावेळी अनेकदा घडत असलेल्या दुर्दैवी घटना इतर राज्यांमध्येही पाहाला मिळतात. अशाच एका घटनेत गणपती विसर्जन करतेवळी काका पूतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्राप्रमाणेच देशभरात विविध ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून गणपती विसर्जनावेळी अनेकदा घडत असलेल्या दुर्दैवी घटना इतर राज्यांमध्येही पाहाला मिळतात. अशाच एका घटनेत गणपती विसर्जन करतेवळी काका पूतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गुजरातमधील राजकोट धरणात गणेशविसर्जनावेळी ही घटना घडली. आमची सहयोगी इंग्रजी वेबसाईट लेटेस्टलीने दिलेल्या वृत्तानुसार, राजकोटमध्ये शहरातील कोठारिया रोडवर असलेल्या मणिनगर सोसायटीतील रहिवाशांसोबत ही घटना घडली. विसर्जन सोहळ्यासाठी आजी धरणाजवळ सोसायटीतील रहिवासी जमले होते. गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी तीन जण नदीत गेले. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहात दोन जण वाहून गेल्याने ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाने तातडीने प्रतिसाद देत पीडितांचे मृतदेह ताब्यात घेतले.
ट्विट
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)