'Modi Surname' Remark Defamation Case: Rahul Gandhi यांना दिलासा नाहीच; शिक्षा माफीचा अर्ज Gujarat High Court नेही फेटाळला
'मोदी' आडनावावरून टीका केल्याने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा झाली आहे. परिणामी त्यांना खासदारकी गमवावी लागली आहे.
राहुल गांधी यांना 'मोदी' आडनावावरून केलेल्या वक्तव्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्यांच्या विरूद्ध मानहानीचा दावा करण्यात आला होता. यामध्ये त्यांनी खासदारकी गमावली आहे. पण या निकालाविरूद्ध कोर्टात त्यांनी धाव घेतली होती. पण शिक्षा माफीचा त्यांचा अर्ज सत्र न्यायालयाप्रमाणे आता गुजरात उच्च न्यायालयाने देखील फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना यंदाच्या संसदेच्या सत्रातही सहभागी होता येणार नाही. दरम्यान त्यांनी खासदारकीमुळे मिळालेले निवासस्थान यापूर्वीच रिकामे केले आहे. राहुल गांधी आता न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचण्याची शक्यता आहे. सध्या कॉंंग्रेस कार्यकर्ते न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध घोषणाबाजी करताना दिसत आहेत. नक्की वाचा: Himnat Biswa Sarma on Rahul Gandhi: Adani सोबत राहुल गांधींनी 5 माजी कॉंग्रेसच्या नेत्यांना जोडत केलेल्या ट्वीट वर पहा Himnat Biswa Sarma, Anil Antony यांनी केलेला पलटवार .
पहा ट्वीट