परदेशी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी एजंट कडून होणार्या फसवणूकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या विद्यार्थ्यांना 'खास' सूचना
शैक्षणिक पात्रता पूर्ण न करताच प्रतिथयश शैक्षणिक संस्थेत खात्रीने प्रवेश मिळवून देण्याचं आश्वासन कुणीच देऊ शकत नाही असा सल्ला देण्यात आला आहे.
परदेशी शिक्षणासाठी जाण्यापूर्वी संस्थांची खात्री करा अशा खास सूचना सरकारने विद्यार्थ्यांना दिल्या आहे. शैक्षणिक पात्रता पूर्ण न करताच प्रतिथयश शैक्षणिक संस्थेत खात्रीने प्रवेश मिळवून देण्याचं आश्वासन कुणीच देऊ शकत नाही असे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी कॅनडा मधून 700 विद्यार्थ्यांना खोट्या ऑफरलेटर्स मुळे भारतात पुन्हा पाठवल्याच्या घटनेनंतर कॅनडा पाठोपाठ ऑस्ट्रेलिया कडूनही उत्तर भारतातील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकरले जात असल्याच्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे आता सरकारने भारतीय विद्यार्थ्यांना अॅडमिशन प्रक्रियेदरम्यान विशेष खबरदारी बाळगण्याचं आवाहन केले आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)