Gangster Jarnail Singh Shot Dead: पंजाबमध्ये गँगस्टर जरनैल सिंगची हत्या; चार जणांनी दिवसाढवळ्या केला अंदाधुंद गोळीबार (Watch Video)
जरनैल सिंगची हत्या करून चारही हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.
पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात गँगस्टर जरनैल सिंगची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अमृतसरच्या सथियाला गावात गोपी घनशाम पुरिया गटाच्या टोळीतील सदस्यांनी जरनैल सिंगवर गोळीबार केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. हे हल्लेखोर स्विफ्ट कारमधून आले होते. जरनैल सिंगची हत्या करून चारही हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी जरनैल सिंह हा त्याच्या गावी घरी होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. चार मुखवटा घातलेले हल्लेखोर येतात आणि जरनैल सिंग याच्यावर अंदाधुंद गोळीबार करतात, असे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. (हेही वाचा: सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर वर्गमित्रासह शाळेतील मुलांनी केला बलात्कार; गुन्हा दाखल, आरोपींना अटक)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)