भाजप आयटी सेलचे प्रमुख Amit Malviya आणि पत्रकार Arnab Goswami यांच्याविरुद्ध FIR दाखल; कॉंग्रेसबाबत खोटी माहिती पसरवल्याचा आरोप

स्वरूप यांनी मालवीय आणि गोस्वामीवर, ‘खोटी माहिती पसरवण्यासाठी एक घृणास्पद आणि गुन्हेगारी प्रेरित मोहीम राबवण्याचा’ आरोप केला. त्यांनी नमूद केले की, आरोपींनी ‘तुर्कीये येथील इस्तंबूल काँग्रेस सेंटर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) चे कार्यालय आहे असा बनावट दावा दुर्भावनापूर्णपणे प्रसारित केला आहे.’

FIR Against Amit Malviya and Arnab Goswami

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आणि रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध, मंगळवारी खोटी माहिती पसरवल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. भारतीय युवा काँग्रेसच्या कायदेशीर कक्षाचे प्रमुख श्रीकांत स्वरूप बीएन यांच्या तक्रारीवरून हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताच्या कलम 192 (दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे) आणि 352 (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून अपमान करणे) अंतर्गत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

स्वरूप यांनी मालवीय आणि गोस्वामीवर, ‘खोटी माहिती पसरवण्यासाठी एक घृणास्पद आणि गुन्हेगारी प्रेरित मोहीम राबवण्याचा’ आरोप केला. त्यांनी नमूद केले की, आरोपींनी ‘तुर्कीये येथील इस्तंबूल काँग्रेस सेंटर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) चे कार्यालय आहे असा बनावट दावा दुर्भावनापूर्णपणे प्रसारित केला आहे.’ भारतीय जनतेला फसवण्यासाठी, एका प्रमुख राजकीय संस्थेला बदनाम करण्यासाठी, राष्ट्रवादी भावना हाताळण्यासाठी, सार्वजनिक अशांतता भडकवण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि लोकशाही अखंडतेला हानी पोहोचवण्यासाठी हे कृत्य स्पष्ट आणि निर्विवाद गुन्हेगारी हेतूने करण्यात आले होते, असेही ते म्हणाले. स्वरूप यांनी प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, सीबीआय आणि इतर कायदा अंमलबजावणी संस्थांना या तक्रारीला आपत्कालीन परिस्थिती म्हणून हाताळण्याचे आवाहन केले. (हेही वाचा: झी न्यूज हॅक? पाकिस्तानी, बांगलादेशी Cybercriminals कडून सर्व्हर हॅक केल्याचा मीडिया आउटलेटचा दावा)

FIR Against Amit Malviya and Arnab Goswami:

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement