Devraj Patel Death: छत्तीसगडचा कॉमेडियन देवराज पटेलचा रस्ता अपघातात मृत्यू; CM Bhupesh Baghel यांनी व्यक्त केला शोक
देवराज पटेलचे यूट्यूबवर 4 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. त्याच्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळायचे. देवराज पटेल याने जाहिरातींमध्येही काम करण्यास सुरुवात केली होते.
छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील प्रसिद्ध YouTuber देवराज पटेल याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. ही बातमी समजल्यानंतर राजधानी रायपूरवर शोककळा पसरली आहे. देवराज पटेलचा 'दिल से बुरा लगता है' हा डायलॉग देशभरात व्हायरल झाला होता. आज (सोमवारी) देवराज रायपूर शहरातील लभंडी भागात व्हिडिओ बनवण्यासाठी निघाला होता, त्यावेळी भरधाव ट्रकची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही ट्विट करून देवराज पटेल याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. देवराज पटेलचे यूट्यूबवर 4 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. त्याच्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळायचे. देवराज पटेल याने जाहिरातींमध्येही काम करण्यास सुरुवात केली होते. तो सोशल मीडिया स्टार अभिनेता भुवन बामसोबत एका व्हिडीओमध्ये दिसला होता. ट्विटरवर मोठ्या संख्येने लोक त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. (हेही वाचा: पत्नीशी अफेअर असल्याच्या संशयावरून व्यक्तीने मित्राचा चिरला गळा, प्यायले रक्त; कर्नाटकातील भीषण घटना)