Arvind Kejriwal भाजपा मुख्यालयाबाहेर आंदोलनासाठी आप नेत्यांसह रवाना (Watch Video)

अरविंद केजरीवाल यांनी आज भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

AAP | X

आम आदमी पक्षाच्या नेत्यांना एकामागून एक तुरुंगात टाकल्याच्या निषेधार्थ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. "मिशन झाडू अंतर्गत आप नेत्यांवर कारवाई केली जात आहे. भाजप ऑपरेशन झाडू चालवत आहे. जे काही केले जात आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. निवडणुकीनंतर आपची बँक खाती जप्त केली जातील. आम आदमी पार्टीला नष्ट करण्याचा हेतू आहे." असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. दरम्यान यानंतर पक्ष नेत्यांसोबत ते भाजपा मुख्यालयाबाहेर आंदोलनासाठी गेले आहेत. मात्र पोलिसांनी कलम 144 लावल्याची घोषणा करत त्यांना रोखलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement