Defamation Case: गुजरात उच्च न्यायालयाकडून Rahul Gandhi यांना सध्या कोणताही दिलासा नाही; न्यायालय सुट्टीनंतर देणार निकाल
मोदी आडनाव प्रकरणी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवल्यानंतर सुरत जिल्ह्यातील एका न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मानहानीच्या प्रकरणात दाखल केलेल्या फौजदारी पुनरीक्षण याचिकेवर मंगळवारी (2 मे) गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा नाकारताना शिक्षेला स्थगिती देण्याच्या त्यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. या प्रकरणी राहुल गांधींच्या अपीलवर गुजरात उच्च न्यायालय सुटीनंतर निकाल देणार आहे.
मोदी आडनाव प्रकरणी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवल्यानंतर सुरत जिल्ह्यातील एका न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राहुल गांधी यांना संसदेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले होते. (हेही वाचा: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, घटस्फोटासाठी सहा महिने थांबण्याची गरज नाही)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement